Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

YouTube व्हिडिओ

67. जारण आणि दंशकालची भयाची जातकुळी एकच | Jaraan | Amruta Subhash | Hrishikesh Gupte

हृषीकेश गुप्ते लिखित-दिग्दर्शित जारण हा चित्रपट सध्या गाजतोय. यानिमित्तानं गुप्ते आणि या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री अमृता सुभाष यांच्याशी लेखिका-मुक्त पत्रकार सुनीता लोहोकरे यांनी राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये विशेष संवाद साधलाय. गुप्ते आणि अमृता यांच्यामधला आणखी एक समान धागा म्हणजे ते दोघंही राजहंसचे लेखक आहेत आणि दोघांच्याही पुस्तकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेच जारणची कथा कशी सुचली, या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया, राधाची मध्यवर्ती भूमिका साकारताना अमृताला आलेली आव्हानं आणि दोघांचंही सध्या सुरू असलेलं नवीन लिखाण यावर या पॉडकास्टमध्ये चर्चा करण्यात आलीय

66. राजीव तांबे यांची प्रसिद्ध नागू कथा | Rajiv Tambe

प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी मुलांसाठी त्यांची नागू ही कथा खास त्यांच्या शैलीत सादर केलीय

65. India-Arab World Relations beyond Oil | Middle East

राजहंसी मोहोरच्या या नवीन व्हिडिओ पॉडकास्टमध्ये लेखिका विशाखा पाटील यांच्याशी राजहंस प्रकाशनाचे सल्लागार संपादक प्रशांत दीक्षित यांनी विशेष संवाद साधलाय. धागे अरब जगाचे, कल्चर शॉक - आखाती देश, सावध ऐका आणि जॉर्ज ऑर्वेल अशा उत्तमोत्तम, अभ्यासपूर्ण पुस्तकांच्या लेखिका अशी विशाखा पाटील यांची ओळख आहे. विशाखाताई या बहारिनस्थित असून, आखाती देशांची संस्कृती, समाजकारण, राजकारण यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. गेले वर्ष-दीड वर्ष सुरू असलेला इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्षावरही त्यांनी या पॉडकास्टमध्ये त्यांची निरीक्षणं नोंदवली असून, भारतासोबतचे आखाती देशांचे संबंध नेमके कसे आहेत यावरही त्यांनी आपले विचार मांडले आहेत. राजहंसी मोहोरच्या व्हिडिओ पॉडकास्ट मालिकेत दर दोन महिन्यांतून एकदा राजहंसी लेखकांशी संवाद साधला जाणार आहे.

64. काजवे - प्रकाशाची फुले | Rekha Majgaonkar

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. डॉ. संदीप श्रोत्री लिखित काजवे प्रकाशाची फुले हा लेख रेखाताई माजगावकर यांनी वाचलाय. ही लेख आवडला का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा!

64. जगणं प्रेमाचं अन् मरणंही | Vaidehi Deshpande

'प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या - ‘मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या - मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी...जगणं प्रेमाचं अन् मरणंही..