Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

YouTube व्हिडिओ

43. पाकिस्तान का मतलब क्या? | Shridhar Loni

पाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण पाकिस्तानला तो पडतोय. ‘पाकिस्तान का मतलब क्या?’ हा प्रश्न आजही तेथे विचारला जातो. उत्तरासाठी इस्लामचा आधार घेतला जातो; मात्र तेथेही उत्तर मिळत नसल्यानं कडवा भारतविरोध जोपासला जातो. धार्मिक ओळख कमी करावी तर वेगळेपण काय राहील याची भीती आणि भारतविरोधाची धार सौम्य करावी, तर मग भारतापासून वेगळे का झालो हा प्रश्न. अस्मितेच्या वावटळीत फसलेल्या या देशाच्या आजवरचा प्रवासाचा वेध म्हणजे श्रीधर लोणी लिखित पाकिस्तान का मतलब क्या? हे पुस्तक.

42. माणूस असा का वागतो? | Anjali Chipalkatti

नैतिकता अन् सामाजिक विषमता, धर्मभावना आणि आध्यात्मिकता, प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय, अनुपालन, धर्म-जात भेदाभेद, कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा... माणसाच्या वर्तनाचे असे अनेकविध पैलू. उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स, मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञान अशा विविध ज्ञानशाखांच्या मिलाफातून माणसाच्या वर्तनाचा अभ्यास चालू आहे. स्वत:चे सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. सहकार्य, परोपकार, साहचर्य हे गुण माणसाच्या उत्क्रांतीत महत्त्वाचे ठरले आहेत. माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का ? मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे - आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे – माणूस असा का वागतो ?

41. Madhav Gadgil Vishesh | Special Interaction | Part P2

द्मभूषण माधव गाडगीळ यांच्याशी शास्त्रज्ञ-संशोधन डॉ. मंदार दातार हे संवाद साधताहेत. निमित्त आहे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक विभागानं नुकतंच Champions of The Earth या पुरस्कारानं माधव गाडगीळ सरांना सन्मानीत केलंय. या विशेष भागाचा हा उत्तरार्ध..

40. Madhav Gadgil Vishesh | Special Interaction - Part 1

पद्मभूषण माधव गाडगीळ म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! निसर्गप्रेम हा माधव गाडगीळांचा श्वास अन् ध्यास. गेल्या पाच तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची अन् जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि सामान्यातल्या सामान्य माणसाप्रति मानत असलेले उत्तरदायित्व या साऱ्यांचे विलक्षण मिश्रण म्हणजे माधव गाडगीळ. त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक विभागाने नुकतेच चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. या विशेष निमित्तानं निमित्तानं या ज्येष्ठ निसर्गवैज्ञानिकांशी संवाद साधताहेत शास्त्रज्ञ-संशोधक डॉ. मंदार दातार..

39. Lata Mangeshkar Vishesh | Dr. Mrudula Dadhe

संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने...