Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

YouTube व्हिडिओ

53. शेक्सपिअरला आठवताना | World Shakespeare Day Special

दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस जागतिक शेक्सपिअर दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राजहंस प्रकाशनाचे संपादक आणि शेक्सपिअरच्या साहित्याचे अभ्यासक शिरीष सहस्रबुद्धे यांनी शेक्सपिअरच्या कलाकृतींचे, त्याच्या साहित्याचे केलेले हे सखोल विश्लेषण..

52. वाचाल तर समृद्ध व्हाल, पण कसं? | World Reading Day Special

n this special episode, author Sanjay Bhaskar Joshi explains why reading is important, how to read, and the abundant benefits of being an avid reader.

51. ६४ घरांच्या गोष्टी | Raghunandan Gokhale

तुम्हाला बुद्धिबळ खेळायला आवडत असेल, तर तुम्ही या पुस्तकाच्या नक्की प्रेमात पडाल! तुम्हाला बुद्धिबळाबद्दल फारशी जाण नसेल, तर मात्र तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे! बुद्धिबळाच्या इतिहासातील अज्ञात वळणांचा, खेळाडूंच्या अप्रतीम कर्तृत्वाचा, अगदी चित्रपटातून दिसलेल्या बुद्धिबळक्षेत्राचा मागोवा घेत हे पुस्तक बुद्धिबळाच्या जगाची एक रोचक सफर घडवते. बॉबी फ़िशर, विश्वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसनपासून गुकेश, हंपीपर्यंत नानाविध खेळाडूंची भेट घडवणाऱ्या रघुनंदन गोखले लिखित ६४ घरांच्या गोष्टी या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

50. शिवरायांचं कार्य कॉर्पोरेटलाही प्रेरणादायी! | Dr. Ajit Apte

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुस्तद्दी राजकारणी होते आणि धुरंधर सेनानी होते. याबरोबरच ते कुशल प्रशासक होते, अर्थतज्ज्ञ होते आणि मानवी संसाधनांची प्रभावी योजना करणारे व्यवस्थापकही होते. शिवरायांच्या कुशल प्रशासनाची, प्रभावी व्यवस्थापनाची आणि यशस्वी अर्थकारणाची अभ्यासू मांडणी म्हणजे डॉ. अजित वामन आपटे लिखित श्रीशिवराय IAS?, श्रीशिवराय MBA Finance? आणि श्रीशिवराय VP HRD? हा तीन पुस्तकांचा संच. या आगळ्यावेगळ्या पुस्तकांविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

49. समलैंगिकतेचं समग्र चित्रण | Apule Apan

आपल्या समाजात काही विषयांवर बोलणं-व्यक्त होणं निषिद्ध समजलं जातं. समलैंगिकता हा असाच एक विषय. समलैंगिकता ही नैसर्गिक आणि अगदी स्वाभाविक गोष्ट असली तरी याविषयी कमालीचं अज्ञान आणि गैरसमज आहेत. जैत लिखित आपुले आपण हे पुस्तक समलैंगिकतेविषयी वास्तवदर्शी विवेचन करतं. या आगळ्यावेगळ्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या भागात.