Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

YouTube व्हिडिओ

58. कोल्होबाची युक्ती | Rajhans Prakashan | Children Stories

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित कोल्होबाची युक्ती ही गोष्ट सहावीतल्या शर्व कुलकर्णी यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.

57. कहाणी एका आधुनिक सुश्रृताची! | Dr Shailesh Puntambekar | Dr Chitralekha Purandare

ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रृताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्र कार्याची. असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, पुणे टेक्निक हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या अनोख्या प्रवासाचा घेतलेला हा वेध.

56. छोट्यांचा मोठा प्लॅन | Children Stories Special

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. मुग्धा शेवाळकर लिखित छोट्यांचा मोठा प्लॅन ही गोष्ट चौथीतल्या गार्गी वैद्य हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.

55. भारत पाकवर सर्जिकल स्ट्राईक करेल? | War Against Terrorism | Part 2

२२ एप्रिल २०२५ रोजी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये २६ पर्यटकांची नृशंस हत्या केल्यावर पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्यदलांना कारवाईचे दिलेले पूर्णाधिकार तर दुसरीकडे भारत पाकवर हल्ला करणार असल्याचं पक्कं इंटेलिजन्स असल्याचं पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांचं वक्तव्य या सगळ्यातून भारत-पाक युद्ध अटळ आहे की २०१६ आणि २०१९ प्रमाणे भारत पाकिस्तानवर सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक करेल हे प्रश्न निर्माण होत आहेत.

54. भारतद्वेषाची पाकिस्तानी गोष्ट | Pahalgam Terrorist Attack | Part 1

पाकिस्तानी लष्करप्रमुख असिम मुनिर यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या पाचच दिवस आधी अनिवासी पाकिस्तानींसमोर एक मोठं भाषण केलं होतं. त्यात त्यांनी पाकिस्तानची गोष्ट पुढच्या पिढ्यांवर बिंबवण्याचं आवाहन केलं होतं. ही पाकिस्तानी गोष्ट नेमकी काय आहे आणि त्या गोष्टीत सांगितलेली उक्ती दहशतवाद्यांनी पहलगामच्या हल्ल्यात कृतीत उतरवली का, याविषयी सांगताहेत ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान का मतलब क्या या पुस्तकाचे लेखक श्रीधर लोणी.