
Praptikaravishayi | प्राप्तिकराविषयी
* प्राप्तिकराविषयी पॅन असला, तर दरवर्षी रिटर्न भरावेच लागते का ?
* मित्राकडून घेतलेल्या गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मिळते का ?
* वैयक्तिक वापरातील वस्तू विकताना होणारा नफा करमुक्त असतो का ?
* रिटर्न नेमके कुणाला भरावे लागतात ? रिटर्न भरलेच नाही, तर काय होते ?
* किरकोळ व्यापा-यालाही आपल्या हिशोबाचे ऑडिट करून घ्यावे लागते का ?
* व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा मिळतो का ?
* फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी किमतीने विकला, तर काय होते ?
* २० हजारांवर रोखीत कर्ज घेतले, तर कर्जाच्या रकमेइतका दंड होतो का ?
* ज्येष्ठ नागरिकाला दरमहा २४ हजार रुपये उत्पन्न मिळूनही प्राप्तिकर कसा
भरावा लागत नाही ?
* जमीन/घर विकून झालेला नफा गुंतवणूक करून वाचवता येतो का ?
या आणि अशाच इतरही असंख्य किचकट प्रश्नांना सुबोध उत्तरे
देणारे हे पुस्तक आहे.
प्रामाणिक करदात्यांप्रमाणेच अनुभवी सल्लागारांनाही ते उपयुक्त ठरू शकेल.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जून २००७
- सद्य आवृत्ती : जून २००८
- मुखपृष्ठ ; सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : F-02-2007
More Books By Milind Sangoram | मिलिंद संगोराम

