
Bypassla Paryay | बायपास'ला पर्याय
हृदयविकार म्हटला, की तुमच्या-आमच्या शंका भरपूर !
हृदयविकार म्हणजे काय ? तो का होतो ? कसा होतो ?
कुणाला होतो ? कधी होतो ?... बायपासला पर्याय असतो का ?
योगासनं, प्राणायाम, आहारनियंत्रण, किलेशन, ईईसीपी यांबरोबर
आपली जीवनशैली आमूलाग्र बदलली, तर हा आजार नियंत्रणात
राहू शकतो का ? कसा ? हृदयविकार टाळण्यासाठी आणि जडलाच
तर नियंत्रणात राहण्यासाठी खाण्यापिण्याची कोणती पथ्यं पाळावीत ?
या आणि याभोवतीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात आहेतच,
शिवाय - दारिद्रयाला टक्कर देत, अंगभूत हुशारी, प्रामाणिकपणा,
कामावरची निष्ठा तसंच वंचितांबद्दल कळकळ असणा-या
डॉ. प्रतीक्षा या तरुण डॉक्टरनं या क्षेत्रात हे नेत्रदीपक यश कसं मिळवलं,
याचंही उत्तर या पुस्तकात आहे.
ISBN: 978-81-7434-396-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००७
- सद्य आवृत्ती : जून २०११
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : J-02-2007